रजनीकांत यांच्या ‘जेलर २’मध्ये झळकणार विद्या बालन, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट; घ्या जाणून…
Vidya Balan Joins Rajinikanth’s Jailer 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ७५व्या वर्षीसुद्धा अभिनेते तितक्याच उत्साहाने काम करताना दिसतात. सध्या ते त्यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. अशातच आता या सिनेमासंबंधित एक अपडेट समोर आली आहे.
नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित १० ऑगस्ट २०२३ रोजी ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली होती. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने जगभरात ६०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
सध्या ‘जेलर २’चं शूटिंग सुरू असून यामध्ये आता बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनची एन्ट्री झाली आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात विद्या बालनही झळकणार आहे. विद्याने नुकताच हा चित्रपट साइन केला असून तिला या चित्रपटाची कथा खूप आवडली आणि यामध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेतून दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.
Key Highlights
विद्या बालनच्या भूमिकेने ‘जेलर २’च्या कथेत महत्त्वाचं वळण येणार असून तिची ही भूमिका ‘जेलर २’मधील महत्त्वपूर्ण भूमिकांपैकी एक असणार आहे. पण, अद्याप या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं नाव कळलेलं नाही. त्यामुळे आता विद्या यातून नेमक्या कोणत्या भूमिकेतून झळकणार, तिच्या भूमिकेमुळे कथेत कसं वळण येणार हे पाहणं रंजक ठरेल.
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार रजनीकांत यांचा ‘जेलर २’ १४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. १० मार्च २०२५मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला चेन्नई येथे सुरुवात झाली होती. त्यानंतर गोव्यातही याचं शूटिंग झालं. आता चित्रपटाचं जवळपास सगळं शूटिंग पूर्ण होत आलंय.
रजनीकांत यांच्या या चित्रपटात लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते मोहनलालसुद्धा झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासह यामध्ये ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्तीसुद्धा पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.
Key Highlights
काही प्रेमकथा काळाच्या प्रवाहात विरून जातात, तर काही इतिहासाच्या पटलावर जखमेसारख्या कायम राहतात. भारतीय राजकारणाच्या धगधगत्या केंद्रस्थानी अशीच एक प्रेमकथा जन्माला आली. गुलाबी स्वप्नांनी सुरू झालेली ही कहाणी फार लवकरच नियतीच्या कठोर वास्तवाला सामोरी गेली. संजय गांधी आणि मनेका गांधी यांची ही कथा केवळ प्रेमाची नाही; ती आहे सत्ता, एकटेपणा, अपघात आणि आयुष्यभर न भरून निघालेल्या विरहाची! ही कहाणी आजही ऐकणाऱ्यांना अस्वस्थ करून जाते!
🏷️ Tags:
#Joins
#Vidya
#Jailer
#Rajinikanth
📰 Source: Read Full Story